Skip to main content

आदरणीय आणि प्रिय वाचकहो,

नमस्कार.

आम्ही २०२५-२६ चा ‘विवेकानंद केंद्र समाचारइलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपल्यापर्यंत पाठवत आहोत.

यंदा २९ जुलैला ‘गुरुपौर्णिमा’ हा पवित्र दिवस आहे. सर्व भारतीयांसाठी गुरुचे स्थान सर्वोच्च आहे, कारण गुरुच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांसाठी ‘ॐकार’ हाच गुरु आहे. याच ॐकारापासून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली आहे. त्या प्रणवरूप ॐकारापासून आम्ही सतत प्रेरणा घेत असतो.

वर्ष २०२५-२६ ने आम्हाला अशक्य वाटणारेही शक्य करण्याची शक्ती दिली आहे. म्हणूनच यंदाच्या वर्षाची संकल्पना आहे – ‘साधना’. ही संकल्पना आमच्यासाठी केवळ विषय नसून प्रत्यक्ष साधनाच बनली आहे. विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते म्हणून आमच्यासाठी प्रत्येक कार्य हे ईश्वरकार्य आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही स्वतःला पुन्हा एकदा स्मरण करून देत आहोत की, आपण त्या दिव्य शक्तीच्या हातातील केवळ एक निमित्त आहोत. निवडलेल्या मार्गावर सातत्याने चालत राहून आपले ध्येय पूर्ण करायचे आहे. कोणतेही कार्य साधना म्हणून केले, तर त्यातून समाधान मिळते; कारण त्या दिव्य स्पर्शामुळे ते आपल्याला प्रसादस्वरूप प्राप्त होते. म्हणून प्रत्येक कार्य ईश्वराला अर्पणभावाने करण्याचा आपण प्रयत्न करूया.

भारतीय म्हणून आमच्यासाठी काहीही अशक्य नाही. ‘विवेकानंद केंद्र समाचार’ वाचताना त्याची प्रचिती आपल्याला निश्चितच येईल.

विवेकानंद केंद्राचे भक्कम आधारस्तंभ असलेल्या आमच्या सर्व परिपोषकांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या आर्थिक आणि नैतिक पाठबळामुळे केंद्राचे कार्यकर्ते तसेच इतर पूर्णकालिक सेवाव्रती मातृभूमीच्या सेवेत कार्यरत राहू शकतात. विवेकानंद केंद्र विविध उपक्रमांद्वारे सातत्याने पुढे वाटचाल करत असून, स्वामी विवेकानंदांचा ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहे.

या उदात्त कार्यासाठी आम्ही आपणास विनंती करतो की, आपल्या वतीने किमान एका नवीन परिपोषकाची नोंदणी करून त्यांना आमच्या परिपोषक परिवारात सहभागी करून घ्यावे.

समाचार वाचल्यानंतर आपला अभिप्राय आम्हाला अवश्य कळवा.

आपल्या आगामी सर्व उत्सवांसाठी आम्ही आपणास हार्दिक शुभेच्छा देतो.

मातृभूमीच्या सेवेत सदैव आपले,

(रेखा दवे)
संयुक्त महासचिव

लिंक : विवेकानंद केंद्र समाचार : २०२५-२६


Click for Download

Get involved

 
 

Be a Patron and support dedicated workers for
their YogaKshema.

Camps

Yoga Shiksha Shivir
Spiritual Retreat
Yoga Certificate Course

Join as a Doctor

Doctors Required at VKPR Hospital
IOCL Refinery Township
Paradip, Odisha.

Opportunities for the public to cooperate with organizations in carrying out various types of work

 

IT Contributors

 
Almighty Software Private Limited
Google
EmailLinkVerification
Microsoft
Zoho