आदरणीय व प्रिय वाचक,
नमस्कार.
आम्ही आपल्याला वर्ष २०२४–२५ चे ‘विवेकानंद केंद्र समाचार (VKS) हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवत आहोत।
२०२४–२५ हे वर्ष आपल्याला सर्व काही शक्य करण्याची ताकद देणारे ठरले आहे आणि म्हणूनच यावर्षीची संकल्पना आहे - “सम्भव करें असम्भव को भी”. अर्थात अशक्यालाही शक्य करून दाखवूया. आपण भारतीय आहोत, त्यामुळे आपल्यासाठी काहीही अशक्य नाही. विवेकानंद केंद्र समाचार वाचताना त्याचीच झलक आपल्याला अनुभवता येईल.
विवेकानंद केंद्राचे (VK) आधारस्तंभ असलेल्या आदरणीय परिपाोषकांना (Patrons) आम्ही मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आपण आर्थिक व नैतिक पाठबळ देऊन आपल्या मातृभूमीच्या सेवेत कार्यरत केडर व पूर्णवेळ कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आहात. विविध उपक्रमांद्वारे विवेकानंद केंद्र निरंतर पुढे वाटचाल करत आहे आणि स्वामी विवेकानंदांचा संदेश - “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” - समाजात प्रसारित करत आहे.
या पवित्र कार्यासाठी आपण आपल्या वतीने किमान एका व्यक्तीला परिपाोषक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत, जेणेकरून ते आमच्या संरक्षक परिवाराचा भाग बनतील.
समाचार वाचल्यानंतर आपला अभिप्राय जरूर कळवावा, ही नम्र विनंती.
आपला,
मातृभूमीच्या सेवेत सदैव तत्पर,
(रेखा दवे)
संयुक्त महासचिव
मो. ९४४३१५०४८८







