Ref. No. JGS/RD/2023-24 Date : Sadhana Diwas 19th November 2024
मान्यवर परिपोषकगण
सप्रेम नमस्कार !
विवेकानंद केंद्राचा 2023-24 चा वार्षिक अहवाल ई - डाक द्वारा पाठवत आहोत. कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
वर्ष 2024 हे सर्व भारतीयांसाठी अत्यंत ईश्वरीय अनुभूती घेण्याचे वर्ष आहे. याच वर्षात अनेक शतकांची प्रतीक्षा संपली. अयोध्या धाम येथे सनातन समाजाने श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य दिव्य सोहळा अनुभवला. प्रभू श्रीरामचंद्र यांचे त्यांच्या जन्मस्थानी दर्शन केले. चिंतन मनन करण्यासाठी केंद्राच्या उपाध्यक्षा माननीया कुमारी निवेदिता भिडे लिखित ‘तवैव कार्यार्थमिहोपजाता:’ हा लेख या अहवालात समाविष्ट आहे.
विवेकानंद केंद्र परिवार सर्व परिपोषकांचे अत्यंत आभारी आहे. आपल्या माध्यमातून सर्व पूर्णकालीन कार्यकर्त्यांचे केवळ आर्थिक रूपाने भरण-पोषण होत आहे असे नाही तर आपल्या आशीर्वादाने ते सतत विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून भारतमातेची सेवा करण्यात अहर्निश कार्यरत आहेत. सर्व पूर्णकालीन कार्यकर्ते, असंख्य स्थानिक कार्यकर्ते यांच्या मौलिक सहकार्याने केंद्र विविध प्रकारचे उपक्रम करत आहे. या कार्याचे वार्षिक विवरण या समाचार अंकात संक्षेपाने मांडले आहे. ‘मानव सेवा हीच माधवसेवा’ हे स्वामी विवेकानंद यांचे वचन आहे. हा अंक त्याची अनुभूती मात्र आहे.
आपल्याला ज्ञातच आहे की, 2023-24 हे वर्ष विवेकानंद केंद्राच्या दृष्टीनेही अधिक महत्त्वपूर्ण आहे. कारण 1973 पासूनच जीवनव्रतींच्या चमूच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली होती. त्यामुळे केंद्राने हे वर्ष ‘विशेष प्रशिक्षण वर्ष’ म्हणून घेतले आहे. संपूर्ण वर्षात अर्थात सप्टेंबर 2024 पर्यंत सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्तही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अंकातून केला आहे.
आपल्याला नम्र विनंती आहे की, विवेकानंद केंद्राचे हे कार्य आपण इतरांपर्यंतही पोहोचवावे. या राष्ट्रीय यज्ञात आपले अमूल्य योगदान देण्यासाठी त्यांनाही प्रेरित करावे. केंद्र समाचारच्या या सादरीकरणाबाबतचा आपला अभिप्राय आम्हास अवश्य कळवा.
देशभरात साजरे होत असलेल्या दीपावली सणाच्या शुभेच्छांसह
भारतमातेच्या सवेत..
रेखा दवे,
संयुक्त महासचिव, 9443150488 (9443150488)
Click here to download Vivekananda Kendra Samachar: 2023-24